कर्कश हॉर्नच्या जागी भारतीय संगीत वापरले जाणार- गडकरी

0

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

वाहनांच्या कर्णकर्कश ‘हॉर्न’मुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होते. परिवहन विभागामध्ये ‘हॉर्न’च्या आवाजाच्या संदर्भात कोणताही कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे ‘हॉर्न’चे आवाज मंजूळ करून त्यात भारतीय वाद्यांचा उपयोग करून आवाज अल्प कसा राखता येईल, या संदर्भात कायदा करण्याचा विचार चालू आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली. ‘ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन’च्या ‘ध्वनीप्रदूषण जागरूकता अभियाना’चे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

भविष्यात रस्त्यावरून चालत असताना हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजांऐवजी पेटी, तबला, तानपुरा किंवा बासरीचा आवाज कानी पडले, तर आश्चर्य वाटून घेऊ नका. वाहनांमध्ये मोठ्या आवाजाच्या हॉर्नऐवजी आता भारतीय वाद्यांचा वापर करण्याच्या दिशेनं पावलं पडत असल्याची माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

वायूप्रदुषणासोबत सध्या ध्वनीप्रदुषणदेखील वाढत आहे. अनेक वाहनचालक त्यांच्या गाडीला मोठ्या आवाजाचे हॉर्न बसवून घेतात. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेकजण गरज नसताना कर्कश हॉर्न वाजवताना दिसतात. तर अनेकदा या मोठ्या हॉर्नमुळे वाहनचालकांचं वाहनावरचं नियंत्रण सुटून अपघात होण्याच्या घटनादेखील घडत असतत. हे टाळण्यासाठी आता कर्कश ह़ॉर्नच्या जागी भारतीय वाद्यांचा वापर करता येईल का, याचा विचार करण्याचे आदेश वाहतूक मंत्रालयाला देणार असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.

रस्त्यावर वाहनांच्या गर्दीत सतत मोठ्या आवाजाचे हॉर्न वाजत असल्याने वाहनचालकांसोबत सर्वसामान्य नागरिकांनाही त्रास होतो. रस्त्याजवळ राहणाऱ्या घरातील लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांवरदेखील हॉर्नच्या आवाजाचे विपरित परिणाम होत असतात. तसेच वेगवेगळे आजार असणाऱ्या रुग्णांनादेखील हॉर्नमुळे त्रास होतो. हॉर्नचा उद्देश पूर्ण व्हावा मात्र आवाजाचा त्रास होऊ नये, यासाठी एक अनोखी कल्पना गडकरींनी मंत्रालयाला सुचवली आहे. त्यानुसार तबला, पेटी, तनपुरा, बासरी यासारख्या भारतीय वाद्यांचा वापर करून नव्या प्रकारचे हॉर्न तयार करण्यावर विचार सुरू आहे. हे हॉर्न काही वर्षांनी बाजारात दाखल होतील आणि मग रस्त्याने जाताना संगीत कानावर पडत राहिल, असं गडकरी म्हणाले.

जुनी वाहनं मोडित काढण्याच्या निर्णयाचं समर्थन करताना त्यांनी त्यामागची काऱणंदेखील सांगितली आहेत. एक जुना ट्रक 11 नव्या ट्रकएवढं प्रदुषण करतो, तर जुनी टॅक्सी 11 नव्या टॅक्सीएवढं प्रदुषण करत असल्याचं सांगत त्यांनी जुनी वाहनं मोडित काढण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.