छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या महिला पोलिसावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला

0

लखनऊ, लोकशाही न्यूज नेटवर्क

दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे महिला पोलिसांना देखील अधिक दक्ष राहावे लागत आहे. मात्र महिलांच्या रक्षणासाठी कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलिसांवर हल्ल्याची घटना घडली आहे. या महिला पोलिसाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

अश्लील कमेंट केल्यानंतर आरोपी तरुणाला जाब विचारला असता, आरोपीने महिला पोलिसावर हल्ला केला. या हल्ल्यात महिला पोलिसाचं डोकं फुटलं असून त्या रक्तबंबाळ झाल्या आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेच्या काही वेळातच पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. ही घटना लखनौ जिल्ह्याच्या अलीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. संबंधित महिला पोलिस या परिसरात गस्तीवर होत्या. यावेळी प्रभात सिंह नावाच्या तरुणाने महिला पोलिसावर अश्लील कमेंट केली. त्यानंतर महिला पोलिसाने तरुणाला जाब विचारला.

जाब विचारल्याच्या रागातून तरुणाने महिला पोलिसावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात महिला स्कूटवरून खाली कोसळली. हा वाद सुरू असताना एकाने जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये कळवलं. त्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल होत, आरोपीला अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.