कन्नड येथे आ. मंगेश चव्हाण यांचा सत्कार

0

चाळीसगाव, लोकशाही न्युज नेटवर्क 

चाळीसगावचे लोकप्रिय आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशन व कन्नड घाटातील वसुली विरोधात घेतलेल्या धाडसी भूमिकेचे स्वागत म्हणून आज औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमप्रसंगी संतपीठ विद्यापीठाच्या अधिव्याख्याता पदी निवड झालेले डॉ. श्रीराधाकृष्ण महाराज अकोलकर तसेच बॅटमिंटनमध्ये रौप्यपदक मिळवणारे भूमिपुत्र निलेश गायकवाड यांचा ही सन्मान चिन्ह देवुन गौरव करण्यात आला.

प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळचे आमदार संजय सावकारे, भाजपा संभाजीनगर जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते, चाळीसगाव येथील पंचायत समिती गटनेते संजय भास्कर पाटील, नगरपालिका गटनेते संजय पाटील, माजी पंचायत समिती सदस्य दिनेश बोरसे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, जेष्ठ विधिज्ञ धनंजय ठोके, तालुका सरचिटणीस अमोल चव्हाण, नगरसेवक भास्कर पाटील, शहर सरचिटणीस योगेश खंडेलवाल, राम पाटील, कैलास नाना पाटील, स्वप्नील निकम, सुनील पवार, मनोज गोसावी, तुषार चव्हाण, जगदीश चव्हाण यांच्यासह कन्नड भाजपचे संजय गव्हाणे सर, किशोर आबा पवार, तालुकाध्यक्ष भगवान कोल्हे, पंचायत समिती उपसभापती सुनील निकम, शहराध्यक्ष सुरेश डोळस, माजी उपसभापती काकासाहेब तायडे, बेलखेड्याचे सरपंच समाधान पाटील, राजेंद्र गव्हाणे, उत्तमकाका पवार, प्रदीप बोडखे, सुभाष ठोंबरे, युवा मोर्चाचे कृष्णा कर्डीले, किशोर क्षीरसागर, धनंजय देशमुख, महेशभाऊ आदी उपस्थित होते.

 

यावेळी आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, खरंतर सत्कार करावा असे मी कोणतेही काम केलेले नसून चुकीच्या बाबींविरोधात एक लोकप्रतिनिधी म्हणून मी केवळ आवाज उचलला आहे. कन्नड आणि चाळीसगाव जरी भौगोलिक, राजकीय दृष्टीने वेगळे असले तरी आपल्यात एक अतूट अस नात निर्माण झालं आहे, त्यामुळे सत्कार स्वीकारण्यापेक्षा आपल्या माणसांशी संवाद साधण्यासाठी मी इथे आलो आहे.

 

माझं कौतुक व्हावं यासाठी मी काम करत नसून सर्वसामान्य जनतेचे हितासाठी काम करतो, त्यामुळे केवळ पोलीस प्रशासनच नाही तर वीज वितरण कंपनीचा मनमानी कारभार, शेतकी संघातील घोटाळा, बोगस खतांचे रॅकेट आदी विषयांवर देखील मी वेळोवेळी आवाज उठवला आहे. आपण घेत असलेली भूमिका जर  प्रामाणिक असेल तर कुणालाही घाबरायचे कारण नाही असे संस्कार मला लहानपणी पासूनच मिळाले आहेत.

 

पुढील काळात देखील कन्नड वासीयांना चाळीसगाव येथे वैद्यकीय असो किंवा इतर कुठलीही मदत असो तुमचा भाऊ म्हणून मी चाळीसगाव येथे उपलब्ध राहील.  हाक मारा हजर आहे अशी ग्वाही याप्रसंगी त्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.