‘एमडीएच’ मसाले कंपनीचे सर्वेसर्वा धर्मपाल गुलाटी यांचे निधन

0

नवी दिल्ली : मसाल्यांचा बादशाह म्हणून जाहिरातीतून प्रसिद्ध असलेले ‘एमडीएच’ मसाले या कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन झाले आहे. ते ९८ वर्षांचे होते.

गुलाटी यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयामध्ये मागील तीन आठवड्यांपासून उपचार सुरु होते. त्यांना आज पहाटेच्या सुमारास कार्डिअॅक अरेस्टचा झकटा आला. त्यातच पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

महाशय धर्मपाल गुलाटी यांचा जन्म पाकिस्तानमधील सियालकोट येथे झाला होता. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले. त्यानंतर मसाल्यांचा उद्योग त्यांनी सुरु केला. आज भारतातच नव्हे तर जगभरात ‘एमडीएच’ मसाले हा एक मोठा नावाजलेला ब्रँड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ‘महाशियां दी हट्टी’ ही मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन करणारी कंपनी ‘एमडीएच’ या नावाने प्रसिद्ध आहे

Leave A Reply

Your email address will not be published.