पारोळा कासोदा रस्त्यावर पायी फिरणाऱ्या व्यक्तीस मोटरसायकलची धडक

0

पारोळा (प्रतिनिधी) : येथील कासोदा रस्त्यावरील शासकीय आयटीआय जवळ पारोळा कुटीर रुग्णालयातील आयसीटीसी विभागातील समुपदेशक कर्मचारी किशोर दत्तु पाटील हे सायंकाळी कासोदा रस्त्यावर पायी फिरण्यासाठी गेले असता त्यांना पारोळा कडून धुळपिंप्री कडे जाणाऱ्या मोटर सायकल चालक रमेश भीमराव निकम वय ४५,धुळपिंप्री ग्रामपंचायतचे कोतवाल यांनी मोटरसायकल भरधाव वेगात चालवून किशोर पाटील यांना मागवून जबर धडक दिली त्यात ते गंभीर जखमी झाले तर रमेश निकम हे देखील रस्त्याच्या कडेला खड्ड्यात फेकले जाऊन जखमी झाले जखमींना १०८ रुग्णवाहिकेत चालक महेश सैंदाने यांनी दाखल करून त्यांच्यावर डॉक्टर योगेश साळुंखे डॉक्टर हेमंत चौधरी यांनी प्रथमोपचार केले,

Leave A Reply

Your email address will not be published.