ओबीसी संवर्गाची एकत्रित ताकद फार प्रभावशाली ठरू शकते – सचिन चौधरी

0

साकळी ता.यावल(वार्ताहर) ओबीसी आरक्षण अबाधीत राहावे व ओबीसी आरक्षणास धक्का लागू नये यासह विविध मुद्दयां संदर्भात शासनाकडे आपले म्हणणे पोहचविण्यासाठी  ना. छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य समता परिषद जळगाव जिल्हा कार्यकारणी च्या वतीने दि.३ रोजी ‘ओबीसी आरक्षण बचाव ‘ मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या मोर्चाबाबत नियोजन करण्यासाठी साकळी ता.यावल येथे आज दि.२ रोजी श्री संत सावता महाराज मंगल कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस समता परिषदचे जळगाव जिल्हा अध्यक्ष तसेच भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन संतोष चौधरी उपाध्यक्ष प्रकाश महाजन(जळगाव) यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्री संतशिरोमणी जगनाडे महाराज व समतेचा विचार मानणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यानंतर सचिन चौधरी यांचा प्रगतिशिल शेतकरी शामकांत वसंतराव महाजन यांच्या हस्ते तर प्रकाश महाजन यांचा शारदा विद्या प्रसारक मंडळाचे संचालक पांडुरंग निळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच उपस्थित मान्यवरांचा संताजी तेली पंच मंडळ साकळीचे अध्यक्ष रवींद्र खेवलकर व सचिव बाळकृष्ण तेली यांच्या हस्ते सुद्धा सत्कार करण्यात आला.ओबीसी संवर्गातील समाज हा विविध जाती-पाती मध्ये विखुरला गेलेला आहे.त्यामुळे ओबीसी संवर्गाची  ताकद आपोआपच विखुरली गेल्याने कमी होत आहे. यामुळे ओबीसी संवर्गाची बाजू न्यायालयातही कमजोर पडत असल्याने न्यायालयात ओबीसी आरक्षणाला धक्का लागण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ओबीसी संवर्गातील सर्व जातीतील समाज बांधवांनी एकत्र येण्याची गरज असून ओबीसी संवर्गाची एकत्रितपणे ताकद शासनाला दाखवली गेली पाहिजे. त्याकरता जास्तीत जास्त संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन सचिन चौधरी यांनी केले.  त्याचप्रमाणे उपाध्यक्ष प्रकाश महाजन यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले.जळगाव येथील ओबीसी मोर्चास जाण्याकरता माजी आमदार संतोष चौधरी व भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या सौजन्याने प्रवासाची वाहनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. असे श्री.चौधरी यांनी सांगितले.

यावेळी प्रगतिशील शेतकरी श्याम महाजन, शारदा विद्या प्रसारक मंडळाचे संचालक पांडुरंग निळे, ग्रामपंचायत सदस्य दिनकर माळी, पीकसंरक्षण सोसायटीचे माजी चेअरमन बापूराव महाजन,रमेश महाजन, भोजराज महाजन,संजय पाटील, रवींद्र माळी, जयंत बोरसे, सुरेश चौधरी,प्रविण माळी,अंबादास बोरसे,सामाजिक कार्यकर्ते बापू साळूंके,भागवत रावते,अशोक चौधरी,बाळकृष्ण तेली,रामा तेली,गणेश खेवलकर,पंढरीनाथ माळी, पिटु लोधी, पत्रकार किरण माळी,चंद्रकांत नेवे,मनू निळे यांच्यासह गावातील ओबीसी संवर्गातील बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.बैठकीदरम्यान कोरोनाचा संसर्ग पाहता सोशल डिस्टन्स सह सर्व नियमांचे पालन केले गेले .

Leave A Reply

Your email address will not be published.