एरंडोल,बाम्हणे,तळई बस त्वरीत सुरू करा ; निपाणे ग्रामस्थांची चिमण आबांकडे मागणी

0

निपाणे ता एरंडोल (वार्ताहर) : कोरोना चा संसर्ग होऊ नये शासनाने प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेस सह खाजगी वाहतूक करणाऱ्या सर्व गाड्यांवर निर्बंध घातले असून ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व गाड्या अजूनही बंद ठेवल्या आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी एरंडोल येथे जाण्यासाठी खुप काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे खाजगी वाहतूक दार अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी करुन प्रवाशांना लुटत आहेत.

त्यामुळे आ, चिमणराव पाटील यांनी लक्ष घालून एरंडोल बाम्हणे मुक्कामी बस एरंडोल बाम्हणे सकाळी दहाची बस तसेच एरंडोल निपाणे व्हाया तळई बसेस त्वरीत सुरू कराव्यात अशा आशयाचे निवेदन निपाणे ग्रामस्थांनी आ, चिमणराव पाटील यांच्या सह एरंडोल आगार प्रमुखांकडे केले आहे निवेदनावर शिवसेनेचे कमलेश राजेंद्र पाटील ग्रा,प सदस्य शरद ठाकूर सागर नगराज पाटील रघूनाथ सोमा महाजन राहूल मच्छिंद्र महाजन मयूर निळकंठ महाजन धर्मराज पंडीत पाटील आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍या आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.