शेतकऱ्यांनी उभारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी यावल येथे आज धरणे आंदोलन

0

यावल (प्रतिनीधी) : भाजपा च्या केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर शेतकरी विरोधात काळे कायदे संमत केले.त्याविरोधात संपूर्ण देशभरात मुख्यतः दिल्लीच्या सिमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन

उभारले आहे.या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री मा.ना. बाळासाहेबजी थोरात साहेब यांच्या आदेशान्वये उद्या दि.03 डिसेंबर 2020 रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

आमदार शिरीष दादा चौधरी व माजी आमदार रमेश दादा चौधरी तालुका अध्यक्ष व गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे ,हाजी शब्बीर शे,  भगतसिंग बापु पाटील ,मा.नितिन दादा चौधरी, मा.लिलाधर शेठ चौधरी, शेखर बापु पाटील  यांच्या प्रमुख उपस्थितात शेतकी संघ यावल येथे सकाळी 10:00 वा. येथून तहसिल कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

जि.प.सदस्य,पं.स.सदस्य,नगरसेवक,सरपंच,ग्राम पंचायत सदस्य,सर्व सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कदिर खान अध्यक्ष काँग्रेस कमिटी यावल शेख रियाज अध्यक्ष काँग्रेस कमिटी फैजपूर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.