Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»पशुधनाची उष्णलहरी पासून बचाव करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना प्रसारित…
    जळगाव

    पशुधनाची उष्णलहरी पासून बचाव करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना प्रसारित…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 28, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

     

    जिल्ह्यासह राज्यात आणि संपूर्ण देशात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. ज्यामुळे जनसामन्यांचे अतोनात हाल होत आहेत. त्यासोबतच पशुधानाचेही हाल होत आहेत. त्याच अनुषंगाने आज माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून पशुधन पालकांसाठी अत्यंत महत्वाच्या सूचना व उपाययोजना प्रसारित करण्यात आल्या आहेत.
    अशा आहेत उपाययोजना
    १. पशुधनास फ्रक्त दिवसाच्या थंड वेळी चरावयास सोडावे,उष्ण कालावधीत सावलीत अथवा हवेशीर निवा-यात ठेवावे.
    २. पशुधनाची वाहतुक फक्त सकाळी व संध्याकाळी करावी. दुपारी ११ ते ४ याजेपर्यंत वाहतुक करु नये.
    ३. उन्हाळा संपेपर्यंत बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येऊ नये,
    ४. पशुधनासाठी स्वच्छ व थंड पिण्याची पाण्याची सोय असावी. पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ ठेवावी. शक्यतो पिण्याच्या पाण्याचे हौद गोठ्याजवळ व सावलीत असावेत.
    ५. पशुधनास मुबलक प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध करुन द्यावा,
    ६. पशुपालनासाठी मुक्त संचार गोठ्याचा जास्तीत जास्त वापर करावा व गोठ्यात स्प्रिंकलर वापरावे.
    ७. शेतीच्या, वहनाच्या व इतर कामासाठी वापरण्यात येणा-या पशुधनास उन्हाच्या (शक्यतोदिवसा ११ ते ४ वाजेपर्यंत) वेळी विश्रांती द्यावी. बैलांना दुपारी कामास जुंपु नये.
    ८. पशुधनास पुरेसे पशुखाद्य व चारा/वैरण द्यावे.
    ९. पशुधनासाठी आधुनिक गोठे असलेल्या पशुपालकांनी स्प्रिंकलर / फॉगर ची सोय करावी. इतर पशुपालकांनी पशुधनावर पाणी मारावे तसेच शक्य असल्यास फॅन/कुलर लावावेत.
    १०. पशुखाद्य देतांना पुरेसेक्षार व जिवनसत्वे मिश्रणे द्यावीत. उत्पादक/दुभत्या पशुधनास संतुलीत आहार द्यावा.
    ११. पशुधनास उघड्यावर बांधु नये किंवा पार्क केलेल्या गाडीत सोडुन जाऊ नये.
    १२. पशुधनाची गर्दी करु नये व दाटीवाटीने बांधु नये. विरळ विरळ बांधावीत
    १३. पशुधनास पिण्याच्या पाण्यासाठी उन्हात फ़ार दुर व फ़ार वेळ चालावे लागु नये याची दक्षता घ्यावी.
    १४. मुक्त संचार गोठा रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीकडुन अनुदानातुन अवलंब करण्यात यावा.
    १५. निकृष्ठ चा-याची पौष्टीकता वाढविण्यासाठी चा-यावर पशुवैद्यकांच्या सल्याने ३-५ टक्के युरीया व मोर्लेसेस प्रक्रिया करण्यात यावी
    १६. जनावरांना कडबा पेंडी ऐवजी चाफ कटर च्या सहाय्याने कुटटी करुन त्याचा वापर करावा, जेणेकरुन चारा वाया जाणार नाही
    १७. पावसाच्या पाण्याने भिजलेला चारा काळा पडल्यास / खराब झाल्यास त्यावर चुन्याची निवडी (१ किलो चुना २० लि पाणी/२०० किलो चारा टॉक्सीन बाईडर १ किलो/टन चा वापर करावा.
    १८. किसान क्रेडीट कार्ड योजनेअंतर्गत दुध उत्पादक पशुपालकांना पशुधन विषयक कर्ज मर्यादा १.६० लक्ष आहे. या योजनेमध्ये कर्जावरील व्याजदरामध्ये २ टक्के पर्यंत सवलत राहिल आहे. सदर योजना कोणत्याही पशुधन खरेदीसाठी नसुन त्यांच्या व्यवस्थापनावरील खर्चासाठी आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #jimaka Heat Wave jalgaon Pashudhan
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार

    November 8, 2026

    फार्मर आयडीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा

    November 7, 2026

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    November 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif