सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या नवा दर

0

नवी दिल्ली : दररोज काही पैसे दरवाढ करून ग्राहकांच्या खिशात हात घालण्याचा प्रयत्न पेट्रोलियम कंपन्यांनी सुरूच ठेवला आहे. आज गुरुवारी देशभरात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल दरात कंपन्यांनी वाढ केली. इंधनाच्या वाढत्या दरानं सर्वसामान्यांची चिंता वाढवली आहे.

आज गुरुवारी पेट्रोल17 पैशांनी तर डिझेल 19 पैशांनी वाढली आहे. आता राजधानी दिल्लीत 1 लिटर पेट्रोलचा भाव 82.66 रुपये झाला आहे. तर एक लिटर डिझेलचा भाव 72.84 रुपये झाला आहे.

14 दिवसांत मोठ्या प्रमाणात तेलाच्या किमतीत वाढ

20 नोव्हेंबरनंतर वाहनांच्या इंधनाच्या किमतीत 10 टक्के वाढ झाली आहे. दोन आठवड्यांच्या दिलाशानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे दर पुन्हा एकदा वाढवले आहेत. 14 दिवसांत पेट्रोल 1.63 रुपये प्रति लीटर महागले आहे. त्याचदरम्यान डिझेलचे दर 2.30 रुपये प्रतिलिटरने वाढले आहेत. 20 नोव्हेंबरपासून इंधनाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. तत्पूर्वी 22 सप्टेंबरपर्यंत पेट्रोलचे दर स्थिर होते. तर डिझेलच्या किमतीत 2 ऑक्टोबरपासन कोणताही बदल झालेला नव्हता.

चार शहरांतील पेट्रोल आणि डिझेलचे भाव

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलच्या किमती वाढून क्रमश: 82.66 रुपये, 84.18 रुपये, 89.33 रुपये आणि 85.59 रुपये प्रतिलिटर वाढले आहेत. चार शहरांतील डिझेलच्या किमती वाढून क्रमश: 72.84 रुपये, 76.61 रुपये, 79.42 रुपये आणि 78.24 रुपये प्रतिलिटर झाल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.