सलग दुसऱ्या सत्रात सोने-चांदी महागले ; जाणून घ्या नवा दर

0

मुंबई : सोने आणि चांदीमध्ये सलग दुसऱ्या सत्रात वाढ झाली आहे. आज बुधवारी सोन्याचा भाव वधारला आहे. मागील काही दिवसांत त्यात झालेल्या नफावसुलीने सोन्याचा भाव पाच महिन्यांच्या नीचांकी स्तरावर आला होता. आज बुधवारी सोन्याचा भाव २४७ रुपयांनी वधारला आहे.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सध्या सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४८८५५ रुपये आहे. तर एक किलो चांदीचा भाव ६३२५२ रुपये असून त्यात ५४ रुपयांची वाढ झाली. दिवसभरात सोने ४८३५४ रुपयांपर्यंत खाली घसरले होते. तर चांदीने ६२३५५ रुपयांचा तळ गाठला होता.

goodreturns या वेबसाईटनुसार आज बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७६३० रुपये होता. २४ कॅरेटचा भाव ४८६३० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेटचा भाव ४७३०० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५१६०० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेटसाठी ग्राहकांना ४७५०० रुपये मोजावे लागतील. तर २४ कॅरेटचा भाव ५०६०० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटचा सोन्याचा दर ४६११० रुपये असून २४ कॅरेटसाठी ५०३०० रुपये आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार सराफा बाजारात सोन्याचा भाव ४८६८७ रुपये आहे. तर चांदीचा भाव ६२०२२ रुपये आहे. यात जीएसटीचा समावेश नाही.आज जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव ०.३ टक्क्यांनी घसरला असून तो १८१०.३६ डॉलर झाला आहे. सोमवारी जागतिक कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीमध्ये मोठी घसरण झाली होती. सोन्याचा भाव १.२ टक्क्यांनी घसरून १७६६.२६ डॉलर प्रती औंस झाला. चांदीचा भाव ३.२ टक्क्यांनी घसरून २१.९६ डॉलर प्रती औंस झाला होता. तर मंगळवारी त्यात वाढ झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.