उशिरा का होईना…जाग आली याचा आनंदच’ ; ना. गुलाबराव पाटलांची अमित शहांवर टीका

0

जळगाव : शिवसेनेनं विश्वासघात केल्याच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या टीकेचा राज्याचे स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जोरदार समाचार घेतला. अमित शहांना दीड वर्षे उशिरा का होईना आता शुद्ध आली, याचा आनंदच असल्याची टीका ना.गुलाबराव पाटील यांनी आज केली. ना. पाटील हे पाळधी येथे एका कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

 

अमित शहा हे दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग येथे एका कार्यक्रमासाठी आलेले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली होती. शिवसेनेने युतीधर्म पाळला नाही. जनदेशाचा अनादर करत सत्तेसाठी शिवसेना विरोधी पक्षांसोबत गेल्याची टीका शहांनी केली होती.

 

त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटील यांनी शहा यांना दीड वर्षांनी शुद्ध आली याचा मला आनंद आहे, अशा शब्दांत टीका केली.

Leave A Reply

Your email address will not be published.