कजगाव मेडीकल असोसिएशन ची नवीन कार्यकारीणीची निवड

0

कजगाव ता.भडगाव:  कजगाव मेडीकल असोसिएशन ची नवीन कार्यकारीणीची निवड दि.६ रोजी संपन्न झाली नवनियुक्त अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव यांचा सत्कार समारंभ दि.८ रोजी मोठया उस्तहात सम्पन्न झाला

कजगाव मेडीकल असोसिएशन ची कार्यकारिणी निवड करण्यात आली यात अध्यक्ष पदी भुपेंद्र मौर्य(पाटील)उपाध्यक्ष पदी राहुल धाडीवाल सचिव म्हणून हर्षल महाजन यांची एकमताने निवड करण्यात आली. नवनियुक्त कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार समारंभ कजगाव पत्रकार मित्र मंडळ व मेडीकल असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता प्रसंगी नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कजगाव येथील पंजाबराव देवकर यांची तालुका कार्यकारिणीत सल्लागार, स्वप्नील ललवाणी यांची तालुका उपाध्यक्ष पदी तसेच रावसाहेब महाजन यांची तालुका कार्यकारीणी वर सदस्य म्हणून निवड झाल्याने त्यांचा हि सत्कार या प्रसंगी करण्यात आला.

प्रसंगी पंजाबराव देवकर, स्वप्नील ललवाणी, संजय पाटील, रावसाहेब महाजन, भुपेंद्र मौर्य, राहुल धाडीवाल, हर्षल महाजन, रिंकू धाडीवाल, स्वप्नील पाटील, प्रमोद ललवाणी, भानुदास महाजन, नितीन सोनार, आत्माराम पाटील, दिपक अमृतकार, संजय महाजन, कैलास महाजन, नाना पाटील, भैय्या पाटील आदि उपस्थित होते. प्रसंगी पंजाबराव देवकर, भानुदास महाजन यांनी मनोगत व्यक्त केले शेवटी पंजाबराव देवकर यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.