इन्स्टाग्रामवर महिलेचे अश्लिल फोटो टाकून बदनामी; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

दिवसेंदिवस सायबर क्राइममध्ये वाढ होत असतानांच सोशल मीडियावर महिलेच्या नावाने बनावट खाते तयार करून अश्लिल फोटो टाकून बदनामी केल्याची प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव शहरातील २९ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह राहते. या महिलाच्या नावाने अज्ञात व्यक्तीने इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून अश्लिल फोटो टाकल्याचा प्रकार ३१ ऑगस्ट रोजी उघडकीला आला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेची समाजात बदनामी होत असल्याने त्यांनी सुरूवातीला चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

त्यानंतर त्यांनी जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात बुधवारी १ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीविरोधात अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.