इकरा थीम महाविद्यालयात क्रीडा विभागातर्फे कार्यशाळा संपन्न

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव येथील इकरा शिक्षण संस्था संचालित एच जे थीम महाविद्यायाच्या आय क्यू ए सी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक संस्था करता “शासनाच्या क्रीडाविषयी विविध योजना विषयी माहिती” करिता एक दिवसीय कार्यशाळाचे आयोजन  करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी डॉ. अब्दुल करीम सालार होते. प्रमुख पाहुणे मिलिंद दिक्षित (जिल्हा क्रीडा अधिकारी),  एम के पाटील (क्रिडा अधिकारी), अरविंद खांडेकर तसेच संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. इकबाल शाह,  सचिव एजाज अब्दुल गफार मलीक, डॉ. ताहेर, अब्दुल अजीज सालार, डॉ. जबिउल्ला शाह, उपस्थित होते.

कार्यक्रमाची  सुरवात कुराण पढणाने प्रा. डॉ.अख्तर शाह यांनी केली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा. डॉ. वकार शेख यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमाची रूप रेषा क्रीडा संचालक प्रा. डॉ. चांदखा यांनी मांडले. त्यानंतर कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन करून उद्घाटन  मिलिंद दिक्षित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

यानंतर त्यांनी शासनाच्या क्रीडा विषयी अनुदानास पात्र कोण होऊ शकतो? प्रस्ताव कसे सादर करावे? यांच्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर  एम के पाटील यांनी क्रीडा अनुदानासाठी लागणारे प्रस्ताव बद्दल मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. सय्यद शजाअत अली यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी मिर्झा इकबाल, रहीम रजा सर, अब्दुल रहीम सर, हनीफ खान सर, यांनी आपले प्रश्न मांडले , त्यांच्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. अब्दुल सालार यांनी म्हटले की, शासानाच्या क्रीडा विषयीजे अनुदान आहे ते मिळविण्यासाठी  प्रयत्न करावे, लवकर प्रस्ताव सादर करावे. जेणे करून आपल्याला सोयी सुविधा मिळू शकेल.

या कार्यक्रमात जळगाव जिल्हा येथील प्राथमिक शाळा व विद्यालय येथील, संस्था चालक, मुख्याध्यापक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  प्रा. पिंजारी, डॉ. युसुफ पटेल, डॉ. अमीन काझी, डॉ. इरफान, डॉ. राजेश भामरे, डॉ. तनवीर खान यांनी परिश्रम घेतले. आभारप्रदर्शन प्रा. साजिद मलक यांनी केले. कार्यक्रमात उपस्थितांना सहभागी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.