कवी ना.धों. महानोर यांच्या पत्नीचे निधन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कवी ना.धों. महानोर यांच्या पत्नी सौ.  सुलोचना नामदेव महानोर (वय 79) यांचे आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी 12 वाजता दुःखद निधन झाले.  त्यांची अंत यात्रा आज दुपारी चार वाजता पळसखेडा येथून निघेल.  त्यांच्या पश्चात पती, 2 कन्या, 2 पुत्र, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

मागील काही  दिवसांपासून त्या आजारी होत्या. सौ महानोर यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू होता. मात्र त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती तसेच अस्वस्थता देखील वाढली होती. म्हणून त्यांना जळगाव येथून त्यांच्या पळसखेडे येथील शेतात नेले व तिथे त्यांनी अंतिम श्वास घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.