आरोग्य विभागाच्या 26 सप्टेंबर रोजी होणाऱ्या परिक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जिल्हा शल्य चिकीत्सक, जळगाव यांचेमार्फत आरोग्य विभागातील गट-ड संवर्गाची परिक्षा रविवार, 26 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 या वेळेत जळगाव शहरातील एकुण 43 उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. सदर परिक्षेच्यावेळी गैरप्रकार होवू नये तसेच परिक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा उत्पन्न होवू नये याकरीता 26 सप्टेंबर, 2021 रोजी पेपर सुरु झालेपासून ते संपेपर्यंतच्या कालावधीसाठी जळगाव शहरातील एकूण 43 उपकेद्राचे 100 मीटर परिसरात कोणीही प्रवेश करु नये.

सदर आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही, तसेच परिक्षा केद्राजवळच्या 100 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन/एस.टी.डी/आय.एस.डी/फॅक्स केंद्र/ झेरॉक्स दुकाने, कॉम्प्यूटर दुकाने व ध्वनीक्षेपक पेपर सुरु असलेल्या कालावधीत बंद ठेवण्यात यावेत.

सर्व संबंधितांवर वैयक्तिकरित्या नोटीस बजविण्यास पुरेसा कालावधी नसल्याने फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार हा आदेश एकतर्फी काढण्यात येत आहे. असे जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.