आमदार किशोर पाटील यांचा पिंपळगाव – शिंदाड परिसरात झंझावात

0

– पिंपळगाव – शिंदाड गटातील मतदार बांधवांनी शिवसेना – भाजपा महायुतीचे आमदार किशोर पाटील यांना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार

पाचोरा (प्रतिनिधी) : येथील शिवसेना – भाजपा  महायुतीचे उमेदवार आमदार किशोर पाटील यांनी दि. १७ रोजी पिंपळगाव – शिंदाड या भागात प्रचार दौरा करीत जनतेचे आशिर्वाद घेतले. आमदार किशोर पाटील यांच्या या दौऱ्याला जनतेतून उत्स्फुर्द प्रतिसाद मिळत असून, परिसरातील जनता हजारोंच्या संख्येने आमदार किशोर पाटील यांना आशिर्वाद देत पुन्हा आप्पा तुम्हीच हे वचन  देत आहेत. त्यांनी असंख्य कार्यकर्तांसमवेत सकाळी हरी हरेश्वर पिंपळगाव येथील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात जाऊन माउलीचे दर्शन घेत प्रचाराचा शुभारंभ केला. या प्रचार दौऱ्यात आमदार पाटील हे मतदार संघातील जनतेचे माता भगिनींचे चरणस्पर्श करीत आशिर्वाद घेत आहेत. पिंपळगाव (हरेश्वर) या गावातील दौऱ्यात आमदार किशोर पाटील यांनी विविध विकास कामे केल्याचा दावा करीत, मतदार संघ सुफलाम सुजलाम करण्यासाठी पुन्हा विजयाचे आवाहन करीत आहेत. जनतेतून मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता आमदार किशोर पाटील यांना पाचोरा – भडगाव तालुक्यातून विक्रमी मताधिक्य मिळेल असा विश्वास शिवसेना – भाजपा युतीचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहे. याप्रचार दौऱ्यात आमदार किशोर पाटील यांच्या सोबत माजी जि.प.सदस्य उद्धव  मराठे, भाजपाचे जि.प.सदस्य मधुकर काटे, कोमल देशमुख, सलीम मेम्बर, विशवनाथ लोहार, शांतीलाल डॉक्टर, विनोद महाजन, भगवान पाटील, बाजीराव गीते, किरण टेलर, रवि गीते, अण्णा तेली, मिलिंद देव, राजबाबू तेली, डॉ.सुनील माळी, प्रितेश जैन, अक्षय जैन, समाधान पाटील, भागवत पाटील, सुनील क्षीरसागर, शंकर गोरे, निंबादास माळी, जितू महाजन, संतोष पाटील, नाना सरकार, राजू मालकर, सुदाम पाटील, मुकेश चौधरी,राहुल चौधरी, समाधान हटकर, राकेश वाघे, गजू पोतदार, अतुल सूर्यवंशी, अलाब तडवी, अशपाक बागवान, राजू मराठे, पदमाकर बडगुजर, असलम पठाण, प्रशांत माळी, राजू बोरसे, कैलास क्षीरसागर, के.टी.पवार, राजधर मालकर, सुरेश पंचशील, माधवराव सांडू, नथ्थु तेली, रघूनाथ पाटील, नितीन चौतमल, पंढरीकाका सावळे, राजू देशमुख आदी भाजपा, शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.