बोदवड बसस्थानकजवळ अज्ञात दुचाकीच्या धडकेत तरुण ठार !

0

बोदवड – येथील बसस्थानकाजवळ भरधाव वेगाने असलेल्या अज्ञात दुचाकीच्या धडकेत एक तरुण जागीच ठार झाल्याची घटना रात्री १० च्या सुमारास घडली. रामचंद्र ऊर्फ बंडू थोरात (रा.चावरदा ता.मोताळा) असे या अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

रामचंद्र उर्फ बंडू थोरात हे मद्यपान करून रस्त्याच्या कडेला झोपलेले असतांना मोटरसायकल स्वार याने भर वेगात असतांना रामचंद्र उर्फ बंडू यांच्या डोक्यावरून गाडी गेली असता त्यात रामचंद्र हा जागीच ठार झाला.त्यात मोटरसायकल स्वार सुद्धा खाली पडल्याने त्याला सुद्धा किरकोळ जखम झाली असून त्याने घटनास्थळाहून पळ काढला.

Leave A Reply

Your email address will not be published.