आता गोव्यातही लवकरच राजकीय भूकंप होणार – संजय राऊत

0

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या संघर्षात भाजपावर मात दिल्यानंतर आता गोव्यातही लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ‘गोव्यातही भाजपाने अनैतिक पायावर आधारलेले सरकार स्थापन केलेले आहे. त्यामुळे शिवसेनेचे महाराष्ट्रानंतर आता मिशन गोवा असेल.

याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की,आताच माझे महाराष्ट्र गोमंतक पार्टीचे नेते सुधीर ढवळीकरांशी बोलणं झालं आहे. गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रमुख विजय सरदेसाईंसह चार आमदार आमच्या संपर्कात आहेत,’ असा दावा संजय राऊत यांनी केला. तसेच भाजपात गेलेले काँग्रेसचे आमदारही संपर्कात, मगो २ आमदार संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितले. गोव्यात भाजपाविरोधात शिवसेनेशी आघाडी उघडणार आहे, पर्रिकरांच्या मंत्रिमंडळात असणारे विजय सरदेसाई यांची समर्थक आमदारांसह शिवसेनेशी आघाडी करणार असल्याचं त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.