जळगावातील औद्योगिक वसाहतीत तरुणाचा खून

0

जळगाव । शहरातील औद्योगिक वसाहत पोलीस स्थानकाच्या हद्दीत अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. शरद विठ्ठल कोळी ( वय ३१ रा. रामपेठ, जुने जळगाव) असे या मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

शरद कोळी हा रात्री जेवण करून औद्योजिक वसाहतीमधील पॅराडाईज कंझुमर प्रॉडक्ट या कंपनी समोरून जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करून जखमी केले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संबंधीत कंपनीच्या शिपायाने या घटनेबाबत माहिती पोलिसांना कळविली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक श्री. वाठोरे यांनी पंचनामा केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.