आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण

0

मुंबई 

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज, सोमवारी सोन्याच्या किंमतीत  मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. एमसीएक्सवर ऑगस्ट डिलिव्हरी वाल्या सोन्यात आज ११६ रुपयांच्या घसरणीसोबत उघडले आहे. जसा दिवस पुढे जात आहे, तशी सोन्याच्या किंमतीत घसरण होत आहे. सकाळी ११ वाजता २८८ रुपयांनी म्हणजेच ०.६ टक्क्यांची सोन्यात घसरण झाली. त्यामुळे सोन्याची किंमत ४७ हजार ६३५ रुपये प्रति १० ग्रॅम झाली. सकाळच्या सत्रात सोन्याच्या दर ४७ हजार ८०७ सर्वाधिक स्तर आणि ४७ हजार ६०२ रुपयांवर पोहोचला होता. तर दुसऱ्या बाजूला चांदीच्या किंमत देखील घसरण झाल्याचे यला मिळाते. सप्टेंबर डिलिव्हरी वाल्या चांदीत ४२१ रुपयांची घसरण होऊन ६८ हजार ८७६ रुपये प्रति किलोवर ट्रेड करत होते.

मागील  आठवड्यात सोन्याची किंमत जवळपास २ हजार ७०० रुपयांनी कमी झाली होती. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोनं ५६ हजार २०० रुपये प्रति १० ग्रॅम झाले होते. परंतु त्यानंतर किंमत सुमारे ९ हजार रुपयांनी कमी झाली. सध्याच्या दिवसात सोन्याच्या किंमतीत सतत चढ-उतार होत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना केसेस वाढल्याबरोबरचं सोन्याच्या किंमतीत वाढ झाली होती. परंतु आता कोरोना परिस्थिती सुधारत असल्यामुळे आणि डॉलर मजबूत होत असल्यामुळे सोन्यात पुन्हा एकदा घसरण होत आहे.

गोल्ड रिटर्न्स या बेवसाईटनुसार मुंबईत सध्या २२ कॅरेटच्या सोन्याची ४७ हजार ८१० रुपये प्रति १० ग्रॅम इतकी आहे. तर २४ कॅरेटच्या सोन्याची किंमत ही २२ कॅरेटच्या सोन्याच्या किंमतीप्रमाणेच आहे. तसेच मुंबईत चांदीची किंमत प्रति किलो ६ हजार ९१० रुपये इतकी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.