तापी नदीवरील हतनूर धरणाचे १६ दरवाजे उघडले

0

जळगाव प्रतिनिधी 

सध्या जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्यामुळे हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज सकाळी ७ वाजता धरणाचे १६ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. आज दि. १२ जुलै रोजी सकाळी ७ वाजता तापी नदीपात्रात ४५८०३ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहेत.

पुढील २४ तासात पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.