आज रक्षाबंधन: भद्रा काळाकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन

0

जळगाव : भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण बुधवारी (दि. ३०) साजरा होणार आहे. हिंदू धर्मात बहिणी या दिवशी भावाच्या मनगटावर राखी बांधतात. अत्यंत प्रेमाचा विश्वासाचा आणि आपुलकीचा असा हा क्षण असतो. बुधवारी भद्रा काळ असला, तरी त्याकडे दुर्लक्ष करून रक्षाबंधन साजरा करावा, असे आवाहन पंचांगकर्त्यांनी केले आहे. यावेळी भद्रा (bhadra) कालावधी पौर्णिमेपासून सुरू होत आहे. त्यामुळे यावेळी 30 च्या रात्री आणि 31 ऑगस्टला सकाळी रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. अशातच रक्षाबंधनाचा सण बुधवार 30 ऑगस्टलाच दिवसभर साजरा करायचा आहे. या दिवशी भद्राकाल असल्याने राखी बांधली तर वाईट होईल. अशा अफवा पसरल्या आहेत. त्यात काहीही तथ्य नाही, असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण  यांनी स्पष्ट केले आहे.

भद्रा काळाविषयी आख्यायिका

भद्राकाळ हा विनाशकारी काळ मानला जातो. म्हणूनच या अशुभ म्हटले जाते. भद्रा काळात राखी का बांधू नये, याबाबत आख्यायिका सांगितली जाते. या आख्यायिकेनुसार त्रेतायुगात रावणाने आपल्या बहिणीकडून भद्रा काळात राखी बांधून घेतली होती. यानंतर त्याच्या विनाशाला सुरुवात झाली आणि अखेर प्रभू श्रीरामांनी त्याचा वध केला. त्यामुळे भद्रा काळात राखी बांधत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.