अल्पवयीन मुलीचे अपहरण; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील शिव कॉलनी येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

अल्पवयीन मुलगी शिवकॉलनी परिसरात तिच्या कुटुंबीयांसोबत राहते. शुक्रवार १७ डिसेंबर राेजी रात्री साडेसात वाजता मुलगी कुणाला काही एक न सांगता घरातुन निघून गेली. पुन्हा घरी परतली नाही. कोणी तिला फुस लावून पळवून नेल्याचा संशय  मुलीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल नीलेश पाटील हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.