अमेठीतील काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात एके-203 रायफलींची निर्मिती- निर्मला सीतारामन

0

नवी दिल्ली :- काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेठी या मतदारसंघात बंद पडलेल्या शस्त्रास्त्र निर्मितीच्या कारखान्याला रशियाच्या सहकार्याने एके-203 या आधुनिक रायफलींची निर्मिती करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रयत्न आणि रशियाच्या सहकार्यामुळे अमेठीत बंद पडलेल्या शस्त्रास्त्र निर्मितीच्या कारखान्यात आधुनिक एके-203 रायफलींची निर्मीती केली जाईल. एके-203 ही रायफल आधीच्या एके-47 रायफलची सुधारित आवृत्ती असेल. भारतीय जवानांसाठी याठिकाणी तब्बल साडेसात लाख आधुनिक रायफलींची निर्मिती करण्यात येईल असे संरक्षण मंत्री म्हणाल्या. या रायफल ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमा अंतर्गत बनणार आहेत. यामध्ये ऑर्डिनंस फॅक्ट्री बोर्ड जवळ मेजॉरीटी शेअर 50.5 टक्के तर रशियाकडे 49.5 टक्के शेअर्स असणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.