स्ट्राइकमध्ये किती दहशतवादी मेले ते सरकार सांगेल; हवाई दल

0

नवी दिल्ली :– भारताच्या हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राईक हल्ला केला. या हल्ल्यात किती किती दहशतवादी मारले गेले हे सरकारने पुराव्यासकट जाहीर करावे अशी मागणी होत असतानाच, याबाबत भारतीय वायू सेनेचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी पत्रकार परिषद घेऊन एअर स्ट्राईकसंदर्भात खुलासा केला आहे. ‘लक्ष्यावर हल्ला चढवणे हे आमचे काम आहे. एअर स्ट्राइकमध्ये किती दहशतवादी मारले गेले हे सांगणे आमचे काम नाही. ते सरकार सांगेल, असे धनोआ यांनी सांगितले.

हवाई दल प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ म्हणाले, आम्ही लक्ष्य ठरवल्यानंतर त्यावरच प्रहार करतो. पाकिस्तानातील बालकोटमध्ये आम्ही लक्ष्यावर अचूक प्रहार केला. आम्ही जंगलामध्ये बॉम्ब टाकले असते तर मग पाकिस्तानने त्यावर प्रतिक्रिया का दिली? असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. पुलावामात झालेल्या दहशवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी २६ फेब्रुवारी रोजी पहाटे भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी जैश-ए-मोहमद्दच्या तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला. या हल्ल्यात दहशतवादी जैश-ए-मोहमद्दचे कंबरडे मोडले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.