अमळनेर येथे पोलिसांनी जप्त केला तब्बल सहा लाखांचा गांजा

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  

चोपडा ते धरणगाव रोडवर अमळनेर पोलिसांनी एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून  वाहून नेला जाणारा तब्बल सहा लाख रूपयांचा गांजा जप्त केला असून तीन आरोपींना गजाआड केले आहे. आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची कोठडी सुनावली आहे.

अमळनेर पोलिसांना धरणगाव ते चोपडा रोडने काही इसम कारमधून गांजा हा मादक अमली पदार्थ कब्जात बाळगुन तिची वाहतुक करत आहेत, याबाबत गोपनीय माहीती मिळाली होती. यानुसार डीवायएसपी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. यात चोपडा ते धरणगाव रोडवर हाटेल इंद्रायणी समोर रोडवर उभे राहुन वाहने चेक करत असताना धरणगाव कडुन चोपड्याकडे  जाणारी एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार क्रमांक एम.एच .०१ बी.टी. ०५०९ ही आली. या कारबाबत संशय आल्याने पोलिसांनी कार चालकासह सोबत चालणार्‍या मोटर सायकल स्वाराला पकडले.

यात आकाश रमेश इंगळे (वय २२ रा. मरीमाता मंदिराजवळ एरंडोल; शकील खान अयुब खान (वय ४२ रा.इस्लामपुरा,कासोदा) आणि सतीश बापु चौधरी (वय ३६ रा.मरीमाता मंदिराजवळ एरंडोल) अशी असल्याचे सांगितले. या आरोपींकडून सहा लक्ष रु. किंमतीचा ३९ किलो ८०० ग्रॅम वजनाचा २० गांजा, चार लक्ष रुपये किमतीची एक स्विफ्ट कार व ५०,०००/- रुपये कि.ची एक दुचाकी असा एकुण साडेदहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला होता.

या संदर्भात पोना मिलींद भामरे यांनी फिर्याद दिल्यावरुन गुरन ३०१/२०२१ ए.डि.पि.एस. कायदा कलम ८,२०,२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहेत. दरम्यान, आज न्यायालयासमोर या तिघांना हजर केला असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई सदरची कारवाई पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे व अपर पोलीस अधिक्षक सचिन गोरे यांच्या सुचनेवरुन व उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर भाग राकेश जाधव याचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल व त्याचे पथकातील सपोनि राकेश परदेशी,  पोहका किशोर पाटील, पोना मिलीद अशोक भामरे, पोका सुर्यकांत साळुखे, पोकाँ अमोल पाटील , चालक मधुकर पाटील यांनी केली आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.