अमरावती येथे संगीतमय श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताह संपन्न

0

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अमरावती येथील अर्बन व्हिलेज रेस्टॉरंट परिसर, सर्किट हाऊस, कॅम्प, येथील हरिभक्त परायण सौ वैशाली ताई पाटील व भाविक भक्त यांच्या संयुक्त विद्यमाने  24 डिसेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत .कोरोना नियमांचे पालन करीत भागवत प्रवक्ते ह. भ. प. दादा महाराज उंबरकर यांच्या अमृतवाणीतून संगीतमय श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

24 डिसेंबर रोजी ब्रम्हमुहुर्तावर विक्रम पाटील, विद्याताई पाटील, विजेंद्र पाटील, स्वाती पाटील यांच्या हस्ते कलश स्थापना करण्यात आली. दैनंदिन कार्यक्रमात काकडा, सामुदायिक ध्यान, भागवतकथा, सामूहिक प्रार्थना, महाआरती, हरिपाठ या सोबतच वृंदावन कॉलनी महिला भजन मंडळ, गजानन महिला भजन मंडळ गोपाल नगर, श्री गुरुदेव सेवा मंडळ वृंदावन कॉलनी, सरस्वती महिला मंडळ, संत कृपा मंडळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गायन मंच, खंडारे यांचा पंचरंगी कार्यक्रम होऊन होम पूजा करण्यात आली व श्रींची मिरवणूक काढण्यात येऊन 31 डिसेंबर रोजी हभप दादा महाराज उंबरकर यांचे  काल्याचे किर्तन झाले व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या भागवत कथा कार्यक्रमाला संगीत साथ ऑर्गन वादक हभप अरविंद महाराज चव्हाण, तबला वादक हभप नितेश गारखेडे, गायक हभप  प्रवीण महाराज तीवस्कर, गायक हभप पद्माकर महाराज वाकोडे, गायक हभप नितीन महाराज भोंडे, हरिपाठ हभप संजय महाराज नाचणे, हार्मोनियम हभप सुधाकर महाराज बाहे आदींनी केली.

याप्रसंगी विक्रम पाटील, विद्याताई पाटील, विलासराव पाटील, हभप वैशालीताई पाटील, विजेंद्र पाटील, स्वाती पाटील, यांच्यासह अनेक भाविक भक्त उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.