डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

0

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क 

श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावती हे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असुन.  डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 123  व्या जयंती पर्वावर महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना व एनसीसी व क्रीडा विभागाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाची चमु रक्त संकलना करिता महाविद्यालयात उपलब्ध झाली.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रेरणा दिलीपबाबू इंगोले यांनी केले. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे होते. उद्घाटन प्रसंगी प्रेरणा इंगोले यांनी सामाजिक भान ठेवून तरुण पिढीने अशाच पद्धतीने उत्साहाने सहभाग घ्यावा असे विचार व्यक्त केले. तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे  यांनी विद्यार्थ्यांना रक्तदान यासारखं सामाजिक भान व इतरांचे प्राण वाचवण्यासाठी कायमच त्यांनी तयार रहावे असा विचार मांडला. या कार्यक्रमाचे संचालन व आभार डॉ. सुवर्णा गाडगे यांनी केले. तसेच या विद्यार्थ्यांचा भरघोस सहभाग या रक्तदान शिबिराला लाभला.

महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. ज्ञानेश्र्वर नामुर्ते, डॉ. सुभाष गावंडे, प्रा. रुपेश के. फसाटे,  प्रा. शिवकुमार साबळे, प्रा. प्रतिक करंडे, प्रा. मनीष भंकाळे यांच्यासह अनेक प्राध्यापकांनी रक्तदान केले तसेच अनेक विद्यार्थ्यांनी देखील या प्रसंगी रक्तदान करुण भाऊसाहेबांना आदराजंली दिली. या वेळी एकूण 49 विद्यार्थ्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. एस. नामुर्ते, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. सुवर्णा गाडगे, एनसीसी विभागप्रमुख प्रा. डॉ. गजानन भारती इत्यादी सह महाविद्यालयातील  एनएसएस  व एनसीसीचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी इत्यादींचा भरघोस प्रतिसाद व सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.