अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांचा १५ वर्षांचा संसार संपुष्टात

0

मुंबई 

बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.  मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून  ओळख असणारा अभिनेता अमिर खान याने आपल्या पत्नीला  घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी परस्पर संमतीने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

आमिर खान आणि किरण राव यांचे १५ वर्षांचा संसार संपुष्टात आला आहे. दोघांनी एकमेकांच्या समहमतीने घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले आहे. दोघांनीही त्यांच्या घटस्फोटाची माहिती चाहत्यांना दिली आहे. नक्कीच दोघांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. चाहत्यांनाही या दोघांच्या घटस्फोटाची बातमीने मोठा धक्काच बसला आहे.दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री होती. एक कपल म्हणून सा-यांचे ते फेव्हरेट बनले होते. घटस्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे कारण समोर आलेले नाही. किरण रावसह आमिर खानचे दुसरे लग्न होते.घटस्फोट झाला असला तरी मुलाची काळजी दोघेही घेत राहतील. आयुष्याची नवीन सुरुवात करत आहोत. दोघेही आता पती पत्नीसारखे राहत नसलो तरी मैत्री कायम राहिल असे आमिर खानने सांगितले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.