अशोक सराफ, रोहिणी हट्टंगडी यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

0

मुंबई लोकशाही न्युज नेटवर्क

दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा गो.ब. देवल पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा पुरस्कार सोहळा १४ जून रोजी मुंबईत होणार आहे. तर यंदाच्या वर्षी हा पुरस्कार जेष्ठ सिने-नाट्य अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहिर करण्यात आला आहे. अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना त्यांच्या कामगिरीसाठी जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. मागील तीन वर्षांपासून पुरस्कारांचे वितरण करण्यात आले नव्हते. नाट्य परिषदेची निवडणूक पार पडताच, कमी वेळात तातडीनं नवनिर्वाचित नियामक मंडळाने जीवनगौरव पुरस्कार देण्याचे योजिले व पुरस्कार देण्यात आले.

यंदाच्या वर्षी 14 जून 2024 रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. तर हा पुरस्कार सोहळा यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टॅक रोड, मांटुगा -माहीम, मुंबई येथे सायंकाळी ४ वाजता होईल. या संबंधीत माहिती ही नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.