अजित पवारांच्या अडचणीत वाढ; १ हजार कोटींची संपत्ती जप्त होण्याची शक्यता

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

आयकर विभागाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरांवर छापेमारी करण्यात आली. यातील पाच संपत्तींवर जप्ती आणण्याचा आदेश काढण्यात आला आहे. राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीवर मोठे संकट आल्याचे बोलले जात आहे. आयकर विभागाने अजित पवार यांच्याशी निगडीत ५ संपत्तीवर जप्ती आणण्याचे आदेश दिले आहेत. ही संपत्ती जवळपास १ हजार कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे.

अजित पवार यांच्याशी निगडीत आयकर विभागाने ५ संपत्तीवर जप्ती आणण्याचे आदेश दिले आहेत. ही संपत्ती जवळपास १००० कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार, आयकर विभागाने ज्या संपत्ती जप्त करण्याच्या संदर्भात नोटीस बजावली आहे. त्यामध्ये एक साखर कारखाना, दक्षिण दिल्लीतील एक फ्लॅट, गोव्यातील मालमत्ता, मुंबईमधील निर्मल इमारतीचा समावेश आहे.

अजित पवार त्यांचे कुटुंबीयांवर क आणि निकटवर्तीयांच्या घरावर आयकर विभागाकडून झाडाझडती करण्यात येत आहे. त्यानंतर आता अजित पवारांच्या संबंधित मालमत्ता जप्तीची नोटीस आयकर विभागाने काढली आहे.

‘या’ संपत्तीवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश

जरंडेश्वर साखर कारखाना – अंदाजित किंमत ६०० कोटी

निलय नावाचं गोव्यातील रिसोर्ट – २५० कोटी

पार्थ पवार निर्मल ऑफिस – २५ कोटी

दक्षिण दिल्लीतील फ्लॅट – २० कोटी

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी असलेल्या जमिनी – जवळपास ५०० कोटी

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.