अंजली दमानियाकडून जळगावला 100 पीपीई कीट

0

जळगाव :- मुंबई येथील व्हाईस ऑफ इंडियन टॅक्सपेअरर्स या संघटनेचे अध्यक्ष वसंत पाटील व कायमस्वरूपी सदस्य असलेल्या समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संघटनेतर्फे आज जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास 100 पीपीई किट उपलब्ध करून दिले.

या संदर्भात जळगाव येथील शिवसेना नेते गजानन मालपुरे यांचेशी संपर्क साधून पीपीई कीट देण्याबाबत बोलणी केली. वैद्यकिय महाविद्यालयाचे डॉ. किरण पाटील यांनी 300 पीपीई कीट मागणीचे पत्र दिल्यावर दमानिया यांनी लगेच 100 कीट उपलब्ध करून दिल्या. जळगावसह औरंगाबाद, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम येथेही त्या पीपीई कीट उपलब्ध करून देणार आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.