लोककरंडक 2020 राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

0

जळगाव | प्रतिनिधी

येथील लोकशाही मिडिया समूह आयोजित आणि नवजीन सुपर शॉप पुरस्कृत लोककरंडक ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

लोक करंडक 2020 या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेसाठी एकूण सहा विषय देण्यात आले असून त्यापैकी एका विषयावर वक्त्याला बोलायचे आहे.

वक्तृत्व स्पर्धेसाठी जे विषय देण्यात आलेले आहेत त्यात 1) प्रत्येक कळीला हक्क आहे फुलण्याचा… 2)नव्या युगाच्या उंबरठ्यावर …3) भयंकर कोण ? कोरानाचा कहर की अफवांचं जहर ? 4) खरंच आपला भारत देश कृषीप्रधान आहे? 5) गुलामांचा आणि गुलाम करणाऱ्यांचा धर्म एक नसतो.. 6) मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा… यापैकी एका विषयावर वक्त्याला बोलायचे आहे.

या स्पर्धेसाठी राज्यातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती परीक्षक म्हणून लाभलेले आहेत.

राज्यस्तरीय लोककरंडक 2020 या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेसाठी एकूण पाच बक्षिसे ठेवण्यात आली असून प्रथम क्रमांकासाठी 5 हजार रूपये व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकासाठी 4 हजार रूपये व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकासाठी 3 हजार रूपये व प्रमाणपत्र, चतुर्थ क्रमांकांसाठी 2 हजार रूपये व प्रमाणपत्र आणि पंचम क्रमांकासाठी 1 हजार रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या ऑनलाईन स्पर्धेसाठी नियम असे राहतील 1) स्पर्धकाला कोणत्याही एका विषयावर कमीत कमी 5 मिनिटे आणि जास्तीत जास्त 7 मिनिटांचा व्हिडीओ तयार करावा लागेल. 2) आपल्या भाषणाचे व्हिडीओ 15 मे पर्यंत संयोजकांकडे पाठवावेत. 3) स्पर्धेसाठी भाषेचे व वयाचे बंधन नाही 4) विजेत्यांची निवड स्पर्धकांच्या भाषणाला मिळणाऱ्या Likes यांचे 50 गुण  आणि मान्यवर परीक्षकांचे 50 गुण यावरून केली आहेत. 5) स्पर्धेसाठी कुठल्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. 6) स्पर्धकांनी पाठवलेले व्हिडिओ लोकलाईव्ह youtube, facebook page, website व  Twitter  या सारख्या सोशल साईटवर प्रसारित करण्याचा अधिकार व तसेच स्पर्धेच्या नियमात ऐनवेळी बदल करण्याचा अधिकार संयोजकाकडे राखीव राहतील. 7) सर्वाधिक लाईक्स, शेअर्स कमेन्टस्‌ असलेला व्हिडीओ असणाऱ्या स्पर्धकाला विशेष पारितोषिक देऊन सन्मानित केले जाईल. 8) 25 मे पर्यंत आपल्या व्हिडीओला मिळालेला प्रतिसाद ग्राह्य धरला जाईल.

आपला व्हिडीओ स्पर्धकांनी [email protected] या इमेलवर पाठवावेत असे आवाहन संचालक राजेश यावलकर, सल्लागार संपादक धों.ज. गुरव, लोकलाईव्हच्या पीआरओ कु. मानसी भावसार यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.