डॉ.उल्हास कडूसकर यांचे निधन

0

जळगाव,दि. 25-
शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ आणि लेखक-साहित्यिक तसेच जळगाव आकाशवाणी केंद्राला कौटुंबिक श्रुतिका झुंबरच्या माध्यमातून नवीन ओळख करून देणारे डॉ.उल्हास नीळकंठ कडूसकर (वय 72) यांचे 25 रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ.ज्योती कडूसकर, मुलगा डॉ.प्रशांत स्नुषा डॉ.सुचित्रा कडूसकर तसेच दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर लिव्हर कॅन्सरची शस्रक्रिया झाली होती.
त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते जळगावी आपल्या रुग्णालयात दर गुरुवारी रूग्णांना विनामूल्य सेवा देत असत.
सेवाभावी वृत्तीचे डॉ.कडूसकर हे गोंदवलेकर बाबांच्या गोंदवले, जि. नगर येथे महिन्यातून एकदा जाऊन विनामूल्य शस्रक्रिया करत असत. जिल्हा सामान्य रुग्णालयात गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी मानद सेवा दिलेली आहे.
दर रविवारी प्रसिद्ध होणार्‍या वीकेंड पुरवणीत ते लिखाण करीत. रंग प्रेमाचे या प्रासंगिक संवादात्मक लेखमालेच्या माध्यमातून त्यांनी माणसांची नाती सुरेख पद्धतीने शब्दबद्ध केली होती.लोकमत च्या 2018 च्या दिवाळी अंकातील … हृदय… ही त्यांची शेवटची कथा ठरली.
त्यांचेवर 25 रोजी सायंकाळी 6 नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे वैद्यकिय व नाट्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांना दै.लोकशाही परिवारातर्फे भावपूर्ण श्रध्दांजली….!

Leave A Reply

Your email address will not be published.