शिवाजी नगर बचाव संघर्ष समितीतर्फे रेलरोकोसाठी अधिकार्‍यांना निवेदन

0

जळगाव –
पर्यायी रस्त्याच्या मागणीसाठी शिवाजी नगरातील दि. 27 रोजी रेल रोको आंदोलन करणार आहेत. यासंदर्भात शिवाजी नगर बचाव संघर्ष समितीतर्फे सोमवारी मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे, पोलीस उपविभागीय अधिकारी निलाभ रोहम, आरडीसी वामन कदम, रेल्वेचे डीआरएम आर. के. यादव यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवाजीनगर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष दीपककुमार गुप्ता यांचेसह शेख इकबाल बाबूजी, सांगोरे, मोहसिन शेख, जितेंद्र पाटील, जहाँगीर खान, अजय घेंघट, आफताब आलम, शकील बागवान उपस्थित होते. संबंधित अधिकार्‍यांना तहसिल कार्यालयापासून पर्यायी रस्ता व रेल्वे गेटची उभारणी जोपर्यंत बळीराम पेठेतून ब्राह्मण सभेपासून भुयारी मार्ग तयार होत नाही तोपर्यंत करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दिलेल्या पत्रात पुलाचे बांधकाम ठेकेदाराबाबतही प्रश्नचिन्ह करण्यात आलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.