सुरगाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क
जिल्हा परिषद शाळा सुरगाणा नं.२ सह तालुक्यात क्रांतीज्योती आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इयत्ता तिसरीतील विद्यार्थीनी वैष्णवी बागुल हिची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष आर्या बिरारी होती.
यावेळी व्यासपीठावर दिक्षाली सुर्यवंशी, लावण्या शेजोळे, अनन्य हटकर, नम्रता बिरारी, सोनाक्षी चौधरी, परिणिती सुर्यवंशी, अंजली बर्डे, निकीता भोये, श्वेता गावित, श्रावणी शिंदे आदी उपस्थित होत्या. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा परिधान केली होती. शालेय विद्यार्थ्यांची भाषणे झाली. प्रभारी मुख्याध्यापक रतन चौधरी समाजातील स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
सन्मान सावित्रीच्या लेकींचा उपक्रम राबविण्यात येणार असून यामध्ये आरोग्य तपासणी, वेशभूषा, मासिक पाळी व्यवस्थापन, कर्तबगार महिलांच्या मुलाखती, समुह गीत गायन, व्याख्यान, चित्रकला स्पर्धा, बेटी बचाव, बेटी पढाओ या विषयावर पंधरवड्यात चित्रकला, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षक चंदर चौधरी, सुधाकर भोये, रमेश राऊत, सुनंदा गायकवाड, कमल पवार, भारती राऊत, भारती ठाकरे, सुशिला चव्हाण, मंगला बागुल सह माजी नगरसेवक राजू बाबा शेख सह पालक उपस्थित होते.