पंतप्रधान घरकुल योजनाच्या खऱ्या लाभार्थींना न्याय द्या : बंजारा सेना

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

पंतप्रधान घरकुल आवास योजना वसंत नगर तांडा तालुका पारोळा जिल्हा जळगाव येथील पंतप्रधान घरकुल आवास योजनेचे ग्रामसभेमध्ये वाचन करण्यात आले. त्यामध्ये खरे लाभार्थींना सोडून धनदांडग्या लाभार्थींच्या नावे घरे मंजूर झालेले आहेत. तसे न करता प्रशासनाने त्याचे सर्वे करून लाभार्थींना गरजू लोकांना न्याय देण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल नाईक यांनी केली आहे. तसे न झाल्यास अखिल भारतीय बंजारा सेना आंदोलन करेल कशी वरिष्ठांनी दखल घ्यावी.

ग्रामीण भागातील गरीब माणूस हा कच्च्या घरात व झोपडीत राहत असतो त्यांच्याकडे लँडलाईन फोन व त्यांचे पक्के घर दाखवण्यात आलेली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांची सखोल चौकशी करून खरे लाभार्थींना न्याय देण्यात यावा. तसेच माननीय गटविकास अधिकारी पारोळा यांना निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी नवल जाधव, ब्रह्मा जाधव, गुरुदेव जाधव, अनिल जाधव, सुरेश जाधव, गणेश जाधव, अनिल जाधव, निरंजन जाधव, विजय जाधव, ईश्वर जाधव, आप्पा जाधव, ठाकूरसिंग जाधव, अंकुश जाधव, आत्माराम जाधव, किरण जाधव, किसन जाधव, रवींद्र जाधव, रघुनाथ जाधव, दीपक जाधव आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.