अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोन जण अटकेत

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

चाळीसगाव शहरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन नराधमांना अटक करून जळगाव येथे हलविले आहे.

शहरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस खाऊ घ्यायला पाचशे रुपये देतो म्हणून दुचाकीवर घेऊन करगांव रोडवरील पडीक घरात घेवून जात  दोन नराधमांनी त्या मुलीवर सामूहिक अत्याचार केला. ही धक्कादायक घटना रविवार रोजी समोर  आली आहे.

याप्रकरणी शहर पोलिसांनी शहरातील सुवर्णाताई नगर येथील दोन्ही आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाहीसाठी त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पिडीतेच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम- ३६३, ३६६ (अ), ३५४ (अ), ३७६ (ड) व पोक्सो कायदा अंतर्गत कलम ४, ५(ग), ६, ८ प्रमाणे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि विष्णू आव्हाड हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here