प्रधानमंत्री जनसुरक्षा विमा योजना अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या संचालकांचा सत्कार

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जनसुरक्षा आभियानामार्फत  विमा योजनेचे उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्र संचालकांनी जास्तीत  जास्त सहभाग नोंदवावा यासाठी भारतीय स्टेट बँकेने ऑगस्ट महिन्यात क्रांती दिनानिमित्त  “ऑगस्ट क्रांती प्रतियोगिता ” पुरस्कार योजना जाहीर केली होती. त्यानुसार तोंडापूर ( ता. जामनेर ) येथील ग्राहक सेवा केंद्राचे संचालक कैलास कोळी यांनी सहभाग घेवून दुसरा क्रमांक मिळवला.

पुरस्कार वितरण सोहळा जळगाव येथील भारतीय स्टेट बँकेच्या  वित्तीय समावेशन विभागाच्या व्यवसाय कार्यालयामार्फत शुक्रवार ( ता १९ ) रोजी आर. बी. ओ सभागृहात संपन्न झाला.  जिल्ह्यात भारतीय स्टेट बँकेचे २५८ ग्राहक सेवाकेंद्र असून  जामनेर भारतीय स्टेट बँक कृषी विकास शाखेचे  पेपाॕईंट या कंपनीचे  तोंडापूर ग्राहक सेवा केंद्राचे संचालक कैलास कोळी यांनी जिल्ह्यातुन द्वितीय क्रमांक मिळवला.  त्यामुळे त्यांचा भारतीय स्टेट बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक मुकेश दलाल यांचे हस्ते रोख रक्कम  (चार हजार रुपये) , सन्मान चिन्ह व प्रमाणपञ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी भारतीय स्टेट बँकेचे जिल्हा प्रबंधक दत्ताञय चौधरी, व्यवस्थापक रितेश निकम, अमोल महाजन, पेपाॕईंट कंपनीचे रविंद्र सपकाळे, योगेश पाटील व जिल्ह्यातील ग्राहक सेवा केंद्राचे संचालक उपस्थित होते.

कोळी यांनी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना  या योजनेची माहीती देऊन  गावात शिबिरे घेतली व शिबिराच्या माध्यमातून   जीवन सुरक्षा विमा व अटल पेंशन योजना प्रभावीपणे राबवली. तालुक्यातील शहापूर तोंडापूर, फत्तेपूर, किन्ही, वडगांव सद्दो, शेंगोळा, मोयगाव, टाकळी खुर्द, गोद्री, कोदोली या गावात शिबिरे घेतली.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अभियानातील तिन्ही गटातील विजेते प्रथम क्रमांक तुषार अरुण पाटील  (लासुर ता. चोपडा), द्वितीय क्रमांक कैलास देवबा कोळी (तोंडापुर ता. जामनेर), तृतीय क्रमांक राकेश भाऊराव सोनवणे  (पारोळा), चौथा क्रमांक दिनेश शिवाजी पाटील (पारोळा), पाचवा क्रमांक उमेश रवींद्र इंगळे (जळगांव), उत्तेजनार्थ  समाधान वामन इंगळे (कानळदा जळगांव), अनिल अशोक पवार (भोकर जळगांव), शैलेश नवनीत भाटिया (धरणगाव), सुनील श्रावण सपकाळे (किनगांव यावल), तैफुर सलीम शेख (यावल), मोहम्मदनाझीम मोहम्मद युसुफ बागवान (एरंडोल), भास्कर साहेबराव सावंत, प्रवीण रमेशराव ठाकूर, नितीन जालमसिंह परदेशी, योगेंद्र सुरेश  महाजन, अमोल सूर्यकांत चौधरी, राकेश भास्कराव गुरव, भागवत लोटीराम भोई, सहदेव नामदेव क्षीरसागर, निलेश ज्ञानेश्वर राजकुळे, उत्कृष्ट समन्वय किरण पाटील, रविंद्र सपकाळे आदिंचा समावेश आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.