महाराष्ट्र समता शिक्षक परिषदेच्या कार्याध्यक्षपदी युवराज सोनवणेंची निवड

0

मनवेल  ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क  

महाराष्ट्र समता शिक्षक परिषदेच्या पुर्व विभागाच्या कार्यकारणीच्या कार्याध्यक्षपदी साकळी ता. यावल येथील शारदा विद्या मंदिर शाळेचे ज्येष्ठ शिक्षक युवराज सोनवणे सर यांची निवड करण्यात आलेली आहे. सदर निवड ही २०२१ ते २०२४ या तीन वर्षाच्या कालावधी साठी करण्यात आलेली आहे. समता परिषदेचा मेळावा दि. २१ रोजी जळगाव येथे सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात झाला.

यात तीन विभागांची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या निवड व सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक विभागाचे राज्य नेते सूर्यकांत गरुड हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, डायट अधिव्याख्याता शैलेश पाटील, परिषदेचे माध्यमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाट, माजी महापौर विष्णू भंगाळे, शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, खलील शेख, माजी शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे, कास्ट्राईबचे विभागीय अध्यक्ष अनिल सुरडकर, समताचे ज्येष्ठ मार्गदर्शक धनराज मोतीराय हे मान्यवर उपस्थित होते.

सोनवणे हे २०१० पासून सतत जिल्हा कार्याध्यक्ष पदावर जबाबदारी सांभाळत असून ते समता शिक्षक परिषदेत स्थापनेपासून कार्यरत आहे. सोनवणे यांची निवड झाल्यावर त्यांचा जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी  खलील शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदरील समता परिषदेत जिल्हाच्या पदावर सोनवणे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.