भारतीय वंशाचे नील मोहन YouTube चे नवे सीईओ

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

युट्यूबच्या सीईओ सुसान व्होजिकी (Susan Wojcicki) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यांनतर भारतीय वंशाचे अमेरिकन नील मोहन (Neal Mohan) यांची यूट्यूबचे (YouTube) नवे मुख्य कार्यकारी अधिकारी  म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेट इंक (Alphabet Inc) ने गुरुवारी दि. 16 फेब्रुवारी रोजी केली.

नील मोहन यूट्यूबचे चीफ प्रोडक्ट ऑफिसर होते. नोव्हेंबर 2015 मध्ये ते यूट्यूबमध्ये रुजू झाले होते. नील मोहन यांच्या लिंक्डन प्रोफाइलनुसार त्यांनी स्टॅनफोर्ड यूनिवर्सिटीतून एमबीए केले आहे. त्यांनी करिअरची सुरुवात एक्सचेंर कंपनीसोबत केली होती. अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, सुसान यांनी एक खूपच चांगली टीम बनवली आहे. नीलच्या रुपात त्यांचा उत्तराधिकारी मिळाला आहे. ते येणाऱ्या दशकात यूट्यूबचे नेतृत्व करण्यासाठी तयार असल्याचे सुंदर पिचाई यांनी म्हटलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.