कोणतेही व्यावसायिक गुन्हेगार आणि माफिया उद्योजकांना धमकावू शकत नाहीत; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

 

सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची जोरदार चर्चा होत आहे. गँगस्टर अतीक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed) यांच्या हत्येनंतर उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक विधान केले आहे. ते म्हणाले की, आता उत्तर प्रदेशात दंगली होत नाहीत. उत्तर प्रदेशात आता कायद्याचे राज्य आहे. तसेच, आता कोणतेही व्यावसायिक गुन्हेगार आणि माफिया कोणत्याही उद्योजकांना धमकावू शकत नाहीत, उत्तर प्रदेश आज तुम्हाला सर्वोत्तम कायदा आणि सुव्यवस्थेची हमी देतो, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

मंगळवारी लोकभवन येथे पीएम मित्र योजनेअंतर्गत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Union Minister Piyush Goyal) यांच्यासमोर सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. त्यावेळी ते म्हणाले यापूर्वी उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली होती, पण ज्या माफियांमुळे जनता आणि सरकार अडचणीत आले होते. तेच आता अडचणीत सापडले होते. त्यामुळे आता आता कोणत्याही जिल्ह्याच्या नावाची भीती नाही. उत्तर प्रदेश आता विकासासाठी ओळखला जातो.

Leave A Reply

Your email address will not be published.