Sunday, January 29, 2023

हिंगोणा येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या

- Advertisement -

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तालुक्यातील हिंगोणा येथील रहिवासी बाळु उखा कोळी (वय 50) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि २८ रोजी निर्देशनास आली.

यावल येथील रहिवासी बाळू कोळी यांनी दि. 28 रोजी सकाळी सहावाजेच्या दरम्यान डोंगर हाळ परिसरातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली.  ते मोल मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होते. विलास कोळी यांच्या खबरी वरून फैजपुर पोलीस स्टेशनला  अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

पुढील तपास हेकॉ  देविदास सूरदास  हेकॉ बऱ्हाटे  हे करीत आहे . शवविच्छेदनासाठी मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी असा परिवार आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे