महिलेच्या पिशवीतून २ लाखाचे दागिने लंपास

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महिलेच्या कापडी पिशवीतून २ लाख ११ हजार २०० रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने चोरून नेल्याचा धक्कादायक घटना जळगाव शहरातील सुभाष चौक येथील सुभाष डेअरी समोर घडली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यशोदा संतोष कोळी (वय ७०, रा. कठोरा ता. जि. जळगाव) या आपल्या कुटुंबियांसह राहतात. २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० ते पावणेचार वाजेच्या दरम्यान वृद्ध महिला या जळगाव शहरातील सुभाष चौकातील सुभाष डेअरी समोर या ठिकाणी बाजार करण्यासाठी आलेल्या होत्या. दरम्यान त्यांच्याजवळ असलेल्या कापडी पिशवीतून तब्बल २ लाख ११ हजार २०० रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेला.

दरम्यान सदर बाब वृद्ध महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु कुठेही माहिती मिळाली नाही. अखेर गुरुवार २७ ऑक्टोबर रोजी यशोदा कोळी यांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल परिस जाधव करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.