यावल पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीचे प्रमाण वाढले

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

यावल तालुक्यातील अनेक गावात आणि शेतात घरफोडीचे तसेच, शेतकऱ्यांची विद्युत केबल चोरीचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढले आहेत. यावल पोलिसांना रात्रीची गस्त वाढवण्याकामी तसेच चोरट्यांना लगेच तात्काळ चौकशी करून अटक करावी अशी मागणी नुकतीच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची भेट घेऊन जिल्हाध्यक्ष ग्रामीण काँग्रेस सेवा फाउंडेशन जलील पटेल, रावेर लोकसभा अध्यक्ष सद्दामसेठ शाह, कोरपावली सरपंच विलास अडकमोल यांनी भेट घेउन चर्चा केली.

या भेटीत लवकरात लवकर चौकशीचे आदेश देऊन चोरट्यांना जेरबंद करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक यांनी संबंधित पोलीस निरीक्षक यांना देण्याचे आश्वासन दिले. तसेच जिल्ह्यात चोऱ्या व घरफोडया रोखण्यासाठी ग्रामसुरक्षादल रात्रीची गस्त म्हणून स्थापन करण्याची संकल्पना पूर्वपदावर असल्याचे सदर भेटीत आश्वासन दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.