संजय गांधी योजनेअंतर्गत वंचित लाभार्थ्यांसाठी शिबीर

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

यावल येथून जवळच असलेल्या कोरपावली ग्राम पंचायतीच्या वतीने रमाई माता जयंतीचे अवचित्य साधून गरीब व गरजू नागरिकांना संजय गांधी योजने अंतर्गत वंचित असलेल्या लाभार्थ्यांना लाभ मिळावा म्हणून एक दिवसीय शिबीर आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जि. प. गटनेते, प्रभाकर सोनवणे यांनी रमाई माता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. प्रसंगी प्रभाकर सोनवणे यांनी सांगितले की, आपण या योजनेबद्दल कुठल्याही एजंट नेमलेला नाही, या योजनेच्या नावाखाली कुणी जर पैसे मागत असेल तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, या योजनेत फक्त एकमेव समितीच काम करू शकते इतर कोणी नाही असे.

यावेळी संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांचे फॉर्म भरून घेण्यात आले. याप्रसंगी पंचायत समिती गटनेते व संजय गांधी योजना समिती अध्यक्ष शेखर पाटील, दहिगाव उपसरपंच किशोर महाजन, ॲड. देवकांत पाटील, संदीप भय्या सोनवणे, कोरपावली सरपंच, विलास तायडे, उप सरपंच हमीदाबी पटेल, सदस्य सत्तार तडवी, सिकंदर तडवी, पंकज नेहेते, भारती नेहेते, सपना जावळे, हुरमत सिकंदर तडवी, गफ्फार तडवी, अविनाश अडकमोल, नागो अडकमोल, तलाठी तायडे, जिप शिक्षक भिरुड, मूनफ जुंमा, पिरण पटेल, सलीम तडवी, किसन तायडे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नारायण अडकमोल यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here