Tuesday, May 24, 2022

व्याजाच्या मोबदल्यात जप्त केलेले मौल्यवान वस्तू परत

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

न्यायालयाच्या आदेशानुसार, व्याजाच्या मोबदल्यात घरातून फ्रीज, टीव्ही आणि मोबाईल यांसारख्या मौल्यवान वस्तू काढून घेतल्याच्या तक्रारीवरून स्थानिक पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी जप्त केलेले साहित्य शुक्रवारी सायंकाळी परत करण्यात आले.

- Advertisement -

यावल तालुक्यातील दहीगाव येथील गुलाब कडू मिस्त्री (वय ४६, व्यवसाय मजुरी) यांनी आपल्या घराच्या किरकोळ कामासाठी यावल येथे राहणाऱ्या सुमित युवराज घारू याच्याकडून ५० हजार रूपये २४ जुलै २०२० रोजी उसनवारीने घेतले होते. दरम्यान मिस्त्री यांनी वेळोवळी घारू यास व्याजासह मुद्दल असा एकुण १ लाख ३५ हजार रूपये परत दिले. त्यानंतर देखील सुमित घारू याने पैसे मागणीचा तगादा सुरूच ठेवला.

मिस्त्री यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने ३० नोव्हेंबर रोजी घारू यांनी मिस्त्री यांच्या घरातील फ्रिज, टिव्ही आणि मोबाईल अश्या वस्तू या जबरदस्तीने घरातून घेवून गेला होता व पुन्हा मिस्त्री यांच्याकडे ५० हजार रूपयांची मागणी करीत पैसे दिले नाही तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी गुलाब मिस्त्री यांनी १२ जानेवारी रोजी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यावर सुमित घारूच्या विरूद्ध तक्रार करण्यात येवुन यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सुमित घारू याच्या विरोधात अवैध सावकारी प्रतिबंधक कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीसांनी तपास कामात घारु याने मिस्त्री यांच्या कडील जमा केलेले फ्रीज, टी. व्ही. व मोबाईल पोलीसांनी यांनी जप्त केले होते. शुक्रवारी ह्या वस्तू यावल न्यायालयाचे न्या. एम एस .बनचरे यांच्या आदेशान्वये पो. नि. सुधीर पाटील यांनी फिर्यादी गुलाब मिस्त्री यांना परत केल्यात.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या