धक्कादायक.. यावलमध्ये १५ वर्षीय मुलीवर अत्याचार; दोघांवर गुन्हा दाखल

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

यावल तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी शेतात अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय मुलगी आपल्या नातेवाईक व कुटुंबियांसह राहते. बुधवारी २६ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही शौचालयासाठी गावातील रोडवर एकटी गेली होती. त्यावेळी गावातील संशयित आरोपी प्रदीप चंद्रकांत धनगर आणि मयुर अनिल धनगर यांनी अल्पवयीन मुलीचे तोंड दाबुन शेजारच्या शेतात ओढून नेले. त्याठिकाणी दोघांनी आळीपाळीने अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केला.

दरम्यान कुणाला सांगितले तर ठार मारण्याची धमकी दिली. अल्पवयीन मुलगी घरी गेल्यावर हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. अल्पवयीन मुलीसह नातेवाईकांनी यावल पोलीस ठाण्यात रात्री ८ वाजता धाव घेवून दोन्ही संशयित आरोपींविरोधात तक्रार दिली.

पीडित मुलीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी प्रदीप चंद्रकांत धनगर आणि मयुर अनिल धनगर यांच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.